संपर्क

तुमच्या प्रतिक्रिया किंवा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवा..!

नमस्कार..!

मी अभिषेक देशपांडे.

टेकमयोसी ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो..!


टेकमयोसी अर्थात, तंत्रज्ञानमय होऊन जाण्याचा प्रवास. या प्रवासात मी तुमचा सोबती आणि सारथी म्हणून येतोय. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात कमालीचा बदल केला आहे. तो आज आपण अनुभवत आहोतच. आपली अनेक कामे करताना, दररोज, आपण वेगवेगळ्या उपकरणांचा, यंत्रांचा आणि वस्तूंचा सहजतेने वापर करतो, पण आपल्यापैकी बर्‍याच जणांना त्याची बारकाईने माहिती नसते. त्यातील तत्त्व आपल्याला कळलेले नसते. कधीकधी खूपच सोपे तत्त्व वापरून तयार केलेली उपकरणेही खूप मोठी कामे सहजतेने करतात. हे सर्व पाहताना आपल्याला कौतुकही वाटते आणि तितकेच आश्चर्यही.


मग जर या सगळ्याचे मूलतत्त्वच आपल्या समोर कोणी ठेवले तर किती मजा येईल ? आपल्याला त्यातून एक वेगळा आनंद मिळेल. आपल्याला या सर्वाची एक खोल जाणीव निर्माण होईल. तंत्रज्ञान आणि आपल्यांत एक घट्ट नाते निर्माण होईल. तंत्रज्ञानाचा सुयोग्य आणि जबाबदार वापर वाढीस लागेल. त्यातून नवनिर्मितीही होईल. तंत्रज्ञानातून आपले जीवन अधिकाधिक सुलभ, संपन्न आणि सुरक्षित होणे गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान साक्षरता गरजेची आहे. टेकमयोसीचा हाच उद्देश आहे.


टेकमयोसीच्या माध्यमातून हे सर्व आपल्यासमोर मांडताना मला खूप आनंद होत आहे.


खालील फॉर्म मधून माझ्याशी संपर्क करा..!